Sunday, March 11, 2012

राहुल द्रविड THE WALL


दि. ९ मार्च २०१२.... राहुल द्रविडने क्रिकेट मधून निवृत्त होण्याची ग्वाही केली. आश्चर्याचा धक्काच बसला होता तो. अजूनही तो काही काळ क्रिकेट मध्ये खेळू शकला असता  तो, त्याने जो निर्णय घेतला त्यावरून काही शंका मात्र नक्कीच निर्माण केल्या आहेत. विविध वर्तमान पत्रे, बातम्या यामधून त्याचे गुणगान होणे नवल नव्हते, आजच्या दिवशी... तशी त्याची कामगिरीही होती. क्रिकेट मध्ये त्याला एक मानाचं नाव हि दिलं होतं ते म्हणजे "the wall" म्हणजेच "भारताची भिंत", या नावानेही तो ओळखला जातो. खरेही आहे, कारण मीही त्याची खेळी पहिली आहे. एका तपस्वी साधूप्रमाणे सर्व आयुष्य क्रिकेट ला अर्पण करून तो खेळत होता. क्वचितच तो कमी रन करून बाद होत होता, परंतु जर टिकला तर समोर येणारा प्रत्येक चेंडू मग जगातल्या कोणत्याही गोलंदाजाचा असू दे, तो त्या चेंडूला आपला बळी होण्याची संधी देत नव्हता, प्रत्येक गोलंदाजाला तो रडवल्याशिवाय राहत नव्हता. त्याला बाद करण्यासाठी सर्व गोलंदाज रक्ताचं पाणी करत असत परंतु " the wall " ला मोडणे एवढे सोपे नव्हते राव.

माझ्यासाठी द्रविड एक आदर्शच आहे असे म्हणायला हरकत नाही. त्याचा स्वभाव, त्याचा भारतीय संघाबरोबरीचा एवढा प्रवास, शिस्तबद्धता, सहनशीलता, शांतपणा, खेळातील तंत्रज्ञान यामुळे तो एक आदर्शच म्हणायला हवा.

क्रिकेटमधील त्याची कामगिरी पाहता आजपर्यंत केलेली सर्वोत्तम कामगिरी हि एकदिवसीय सामन्यापेक्षा कसोटी मध्ये केलेली आहे. त्याने १६४ कसोटी सामने खेळले असून त्यात १३२८८ रन्स केलेत व सचिन नंतर सध्या जगातील २रा खेळाडू ठरला आहे, तर ३६ शतके ठोकत २०० पेक्षा जास्त झेल घेतल्या आहेत, त्याचा तो क्रिकेट प्रवास आठवला कि एका महापुरुषाची आठवण येते, अंगावर शहरे येऊन खूप अभिमान वाटतो त्याचा. खरच त्याला या क्रिकेट मध्ये व जन्मात विसरणे शक्य नाही. सौरव गांगुली ने कर्णधार पद सोडल्यानंतर राहूलनेच कर्णधारपदाचा भार सांभाळला होता. तसेच तो एक चांगला यष्टीरक्षक हि आहे. कधी कधी गोलंदाजीही केली आहे. त्यामुळे तो एक अष्टपैलू खेळाडू आहे. अशा या खेळाडूला माझ्या कडून पुढील आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना व शुभेच्छा.

- महेंद्र राजेशिर्के

Thursday, March 8, 2012

वाचक हाच श्रोता?

वाचनाचा छंद अनेकांना असतो. तसेच ती एक चांगली सामाजिक कृती अथवा संस्कार आहे. वाचनासाठी  आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे लहानपणीचे शिक्षण, या शिक्षणामुळे आपल्याला लिहिता, वाचता येते. सर्वच जण शिकतात, शाळेत तसे भाग असते, लिहिणे आणि वाचणे, परीक्षा देणे इ. त्यातील काहीच जणांना वाचनाची आवड लागते, लिखाणाची आवड निर्माण होते. तासनतास वाचन करणे हे त्यांना कठीण नसते. तर तो त्यांचा छंद बनून जातो. 

बरं वाचन खूप प्रकारचे असते, त्यायोगे वाचकांचे वर्गीकरण करता येईल. अध्यात्मिक वाचन करणार्यापासून ते रोजच्या घडामोडी तील वाचकांचे यात वर्गीकरण होईल. कुणाला गूढ-रहस्य कथा वाचण्याचा तसेच राजकारणी वाचनाचा शौक, कुणाला विज्ञानाचे वाचन आवडणे तर कुणाला इतिहासाचे. खूप प्रकारचे साहित्य व त्याचे वाचक आहेत. असाच एकदा प्रश्न पडला कि वाचक आणि श्रोता यात फरक काय.

वाचक म्हणजे जो लिखित स्वरूपातील साहित्य वाचतो. तर श्रोता ते साहित्य अभिनयातून बघतो. शेवटी शब्द तेच, सादरी करणात काय तो फरक. माझ्या मते श्रोता जो चित्रपटाच्या व लघुपटाच्या माध्यमातून ते विचार आवडीने एकतो व त्याला त्याचा छंद असतो. श्रोता हाही एका वाचाकासारखा असतो का, घराघरात लागणाऱ्या धारवाहिका लोकं आवडीने दररोज न चुकवता बघतात. किंवा विकत आणून बघतात. जसे एखादे पुस्तक विकत आणावे. पुस्तक वाचावे तसेच एखाद्या लघुपटावर खर्च करावे दोन्हीही सारखेच फक्त उद्देशाच्या दृष्टीने खर्चाच्या नाही. तशी malahi खूप आवड आहे या लघुपटांची, एखाद्या कादंबरीवर एखादी मालिका बनवली तर त्यात फरक काय? मग मी हि मला एक वाचकाच समजेन ना? यावर जरा पुढे वाचूया
काही मुद्दे महत्वाचे वाटतात इथे नमूद करण्यासारखे, खर्चाच्या बाबतीत बघितल्यास पुस्तक वाचताना आपण, पुस्तक आणि तिसरी गोष्ट म्हणजे शांत वातावरण. या खेरीज कशाचीजी गरज लागत नाही. परंतु एखादी मालिका पडद्यावर उतरवायची असेल तर त्याला असलेले खर्च लक्षात घेणे महत्वाचे आहे. मालिकेसाठी अभिनेते, कॅमेरा, योग्य जागा, तसेच त्याचे भाडे इ. गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळेच तर बनलेली मालिका अधिक रंगवून सांगितली जाते, आणि योग्य प्रकारे दाखवली जाते. काय खरच श्रोता जशी मालिका पाहतो तसे पुस्तक वाचेल? तो बघण्याचे माध्यमाच निवडेल. त्यामुळे वाचन आणि माध्यम यात फरक आहेच. कारण प्रत्येक कादंबरीचे मालिकेत रुपांतर करणे जमत नाही, अशा मौल्यवान माध्यमांचे वाचन करण्याच मोह वाचकाला का नाही होणार बरं 

दि. ८ मार्च, २०१२ (धुलीवंदन)
महेंद्र रमेश राजेशिर्के