वाचनाचा छंद अनेकांना असतो. तसेच ती एक चांगली सामाजिक कृती अथवा संस्कार आहे. वाचनासाठी आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे लहानपणीचे शिक्षण, या शिक्षणामुळे आपल्याला लिहिता, वाचता येते. सर्वच जण शिकतात, शाळेत तसे भाग असते, लिहिणे आणि वाचणे, परीक्षा देणे इ. त्यातील काहीच जणांना वाचनाची आवड लागते, लिखाणाची आवड निर्माण होते. तासनतास वाचन करणे हे त्यांना कठीण नसते. तर तो त्यांचा छंद बनून जातो.
बरं वाचन खूप प्रकारचे असते, त्यायोगे वाचकांचे वर्गीकरण करता येईल. अध्यात्मिक वाचन करणार्यापासून ते रोजच्या घडामोडी तील वाचकांचे यात वर्गीकरण होईल. कुणाला गूढ-रहस्य कथा वाचण्याचा तसेच राजकारणी वाचनाचा शौक, कुणाला विज्ञानाचे वाचन आवडणे तर कुणाला इतिहासाचे. खूप प्रकारचे साहित्य व त्याचे वाचक आहेत. असाच एकदा प्रश्न पडला कि वाचक आणि श्रोता यात फरक काय.
वाचक म्हणजे जो लिखित स्वरूपातील साहित्य वाचतो. तर श्रोता ते साहित्य अभिनयातून बघतो. शेवटी शब्द तेच, सादरी करणात काय तो फरक. माझ्या मते श्रोता जो चित्रपटाच्या व लघुपटाच्या माध्यमातून ते विचार आवडीने एकतो व त्याला त्याचा छंद असतो. श्रोता हाही एका वाचाकासारखा असतो का, घराघरात लागणाऱ्या धारवाहिका लोकं आवडीने दररोज न चुकवता बघतात. किंवा विकत आणून बघतात. जसे एखादे पुस्तक विकत आणावे. पुस्तक वाचावे तसेच एखाद्या लघुपटावर खर्च करावे दोन्हीही सारखेच फक्त उद्देशाच्या दृष्टीने खर्चाच्या नाही. तशी malahi खूप आवड आहे या लघुपटांची, एखाद्या कादंबरीवर एखादी मालिका बनवली तर त्यात फरक काय? मग मी हि मला एक वाचकाच समजेन ना? यावर जरा पुढे वाचूया
काही मुद्दे महत्वाचे वाटतात इथे नमूद करण्यासारखे, खर्चाच्या बाबतीत बघितल्यास पुस्तक वाचताना आपण, पुस्तक आणि तिसरी गोष्ट म्हणजे शांत वातावरण. या खेरीज कशाचीजी गरज लागत नाही. परंतु एखादी मालिका पडद्यावर उतरवायची असेल तर त्याला असलेले खर्च लक्षात घेणे महत्वाचे आहे. मालिकेसाठी अभिनेते, कॅमेरा, योग्य जागा, तसेच त्याचे भाडे इ. गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळेच तर बनलेली मालिका अधिक रंगवून सांगितली जाते, आणि योग्य प्रकारे दाखवली जाते. काय खरच श्रोता जशी मालिका पाहतो तसे पुस्तक वाचेल? तो बघण्याचे माध्यमाच निवडेल. त्यामुळे वाचन आणि माध्यम यात फरक आहेच. कारण प्रत्येक कादंबरीचे मालिकेत रुपांतर करणे जमत नाही, अशा मौल्यवान माध्यमांचे वाचन करण्याच मोह वाचकाला का नाही होणार बरं
दि. ८ मार्च, २०१२ (धुलीवंदन)
महेंद्र रमेश राजेशिर्के
No comments:
Post a Comment