कधी कधी अशीच जरा झोप लागते आणि तेच स्वप्न पडते, तो आठवड्याचा बाजार, तो
जांभळा दिवस, जांभळा रंग, जरा वेगळाच वाटतो, एक असा रंग कि जो लाल आणि
पांढर्या रंगाच्या मधला, एक असा भावनिक छटा दर्शवणारा, म्हणजेच जरा रोमांच
आणि शांतता खूप मोठी सहनशीलता असा काही, त्यांच्या मधलाच जरासा पण असा रंग
कि ज्याला मर्यादा आहेत. धीर देणारा, आवरणारा, तटस्थ असा रंग.
दुपार्नान्तारच्या त्या हलक्या उनामधील ती पठारावरील गार वाट, दुतर्फा
परंतु जरा लांबवर असलेली हिरवी गर्द झाडे, मधल्या जागेत खूप फुले तीही
जांभळी गर्द, अशीच कल्पना येते.
त्या वातावरणातील त्या जांभळ्या भावना, संथ एकांत व धगधगत्या अशा काही. सफेद कपड्यावर एक जांभळा डाग पडावा तसाच काहीतरी, एका जांभळाचा स्पर्श असाच तो जांभळा दिवस, जांभळा क्षण आणि त्या जांभळ्या कल्पना कधी कोणाला आल्यात का, विचारा स्वतःलाच कधीतरी त्या जांभळ्या क्षणी.
दि. ८ एप्रिल, २०१२

No comments:
Post a Comment