Wednesday, August 8, 2012

चला शाळला

चला शाळला
स्कूल बस नसली म्हणून काय झाले,
आमच्या गळ्यात टाय असला काय अन नसला काय
चड्डीला बटन असली काय नसली काय
टोपीला इस्त्री असली काय नसली काय
शीक बाबा शीक लढायला शीक
कुणब्याच्या पोरा आता लढायला शीक !!धृ!!

लाजरेपणा बुजरेपणा बाजारात ईक
घेऊ नको फाशी बाबा खावू नको ईख
माग माग नको पुढ सरकायला शीक
आत्महत्या नको हत्या करायला शीक !!१!!

कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोर
बुडविती त्याचा कधी करिता न घोर
तुला टाळून जाणार्याला आडवायला शीक
घेतलेली कर्ज सारी बुडवायला शीक !!२!!

उंटाऊन शेळ्याहाकी सरकार शहाण
त्याच्यामुळ जीव तुझा पडला गहाण
तुझ ऐकत नाही त्याला झाडायला शीक
तूच दिली सत्ता त्याला पडायला शीक !!३!!

जातील हे दिस आणि होईलहि ठीक
उद्या तुझ्या शेतामध्ये उधाणेल पीक
गाळलेल्या घामासाठी रस्त्यावर टीक
हक्कासाठी लढ बाबा मागू नको भिक !!4!!
- अनामिक

Saturday, April 14, 2012

आनंदवन आणि दान

वादग्रस्त? आणि एखादी देणगी किंवा दान? डोकं फिरलंय का टीकाकारांच., मग स्विस बँकेतला पैसा हि अनु नका भारतात. तोही काळाच आहे. एखादी व्यक्ती देणगी देते मग ती व्यक्ती कोणतीही असुदे त्या व्यक्तीने जर तो पैसा चांगल्या कामासाठी खर्च केला तर यात सामान्य किंवा पवित्र माणसाच्या प्रयत्नांचा विजयाच म्हणावा लागेल. उलट वाद्ग्रस्थ असा सर्व पैसाच गरिबांसाठी खर्च व्यव अशी अपेक्षा ठेवायला पाहिजे, कोणत्या बळावर हे टीकाकार स्वतःला ईश्वरनिष्ठ समजतात? सर्व राजकीय पक्ष व्यावसायिक यांचा कला पैसा समाजसेवेसाठी खर्च केला पाहिजे, शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रजेच्या हितासाठी सुरत लुटली होती. मग त्या स्वराज्यात जन्मलेली हि मानसी असे कसे बोलू शकतात. अनमिशिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना देऊ केलेला नजराणा तुकारामांनी अमान्य केला, तो विषय वेगळा होता, तुकारामांना दोन वेलची भाकरी मिळत होती, आनंदवनातील रुग्णांना ती मिळते का किंवा एव्हडी मदत मिळते का? मग का जाहिरात केली एवढी? जाहिरात करताना अति लागू करायला पाहिजे होत्या(पुणेरी भाषेत), १००% विश्वासाने सांगतो कोणीही मदत केली नसती. हि मदत केवळ बाबा आमटे यांच्या समाजसेवेला अर्पण होत आहे. वादग्रस्त पैसा कुठून येतो याची चर्चा वेगळी झाली असती. परंतु आनंदवनाच्या रुग्णांसाठी मदतीची गरज आहे, मग सर्व स्तरातून पैसा येण्याची प्रार्थना केली पाहिजे. याउलट टीका करून आम्हाला फक्त गोरा पैसा पाहिजे याची अपेक्षा करत राहिलो तर तुम्ही हि उपाशी मारलं आणि आनंदवनातील रुग्ण हि. आणि आलेला पैसा हा कोणत्या कारणासाठी खर्च केला जातो याचा विचार महत्वाचा, स्वतः बाबा आमटे यांनी अशी शिकवण केली कि कोणालाही नाही म्हणून नये अशा गोष्टीसाठी, मग त्यांचा आदर्श घेणारे कोणत्या बळावर स्वतःला विचारवंत समजतात याचाच विचार प्रथम करणे गैर नाही.

दि. १५ एप्रिल २०१२

Sunday, April 8, 2012

रंग जांभळा

कधी कधी अशीच जरा झोप लागते आणि तेच स्वप्न पडते, तो आठवड्याचा बाजार, तो जांभळा दिवस, जांभळा रंग, जरा वेगळाच वाटतो, एक असा रंग कि जो लाल आणि पांढर्या रंगाच्या मधला, एक असा भावनिक छटा दर्शवणारा, म्हणजेच जरा रोमांच आणि शांतता खूप मोठी सहनशीलता असा काही, त्यांच्या मधलाच जरासा पण असा रंग कि ज्याला मर्यादा आहेत. धीर देणारा, आवरणारा, तटस्थ असा रंग. दुपार्नान्तारच्या त्या हलक्या उनामधील ती पठारावरील गार वाट, दुतर्फा परंतु जरा लांबवर असलेली हिरवी गर्द झाडे, मधल्या जागेत खूप फुले तीही जांभळी गर्द, अशीच कल्पना येते.

त्या वातावरणातील त्या जांभळ्या भावना, संथ एकांत व धगधगत्या अशा काही. सफेद कपड्यावर एक जांभळा डाग पडावा तसाच काहीतरी, एका जांभळाचा स्पर्श असाच तो जांभळा दिवस, जांभळा क्षण आणि त्या जांभळ्या कल्पना कधी कोणाला आल्यात का, विचारा स्वतःलाच कधीतरी त्या जांभळ्या क्षणी.

दि. ८ एप्रिल, २०१२ 

Sunday, April 1, 2012

Cufon and IE7

Hi everybody, I am going to discuss on cufon and the difficulties we might face while developing a website. Often i had to use cufon script to embed fonts in websites, where we can apply the font to one class or id. Webfontkit (fontsquirrel[dot]com/fontface/generator) method is much better because it dosent convert the text with cufon or canvas tag. But some fonts are restricted or not permitted in this method or site (ex:Myriad-Pro)

So for cufon the class or id can be define in a script straight below of the script as below.

<script src="js/Myriad_Pro_400-Myriad_Pro_600.font.js" type="text/javascript"></script>
<script type="text/javascript">Cufon.replace('.myclass', { fontFamily: 'Myriad Pro', fontWeight: '400'});</script>

as above script, i have used ".myclass" the css class, but a browser cant get the script or method. Because for cufon IE7 reads only tags (ex: h1, div, body, span, li). so i wrap the class with h1 or h2 tag as below ex:.

<script type="text/javascript">Cufon.replace('h1', { fontFamily: 'Myriad Pro', fontWeight: '400'});</script>
<script type="text/javascript">Cufon.replace('h2', { fontFamily: 'Myriad Pro', fontWeight: '600'});</script>

I don't know how many of you know the trick for IE7, lets share thoughts.

Sunday, March 11, 2012

राहुल द्रविड THE WALL


दि. ९ मार्च २०१२.... राहुल द्रविडने क्रिकेट मधून निवृत्त होण्याची ग्वाही केली. आश्चर्याचा धक्काच बसला होता तो. अजूनही तो काही काळ क्रिकेट मध्ये खेळू शकला असता  तो, त्याने जो निर्णय घेतला त्यावरून काही शंका मात्र नक्कीच निर्माण केल्या आहेत. विविध वर्तमान पत्रे, बातम्या यामधून त्याचे गुणगान होणे नवल नव्हते, आजच्या दिवशी... तशी त्याची कामगिरीही होती. क्रिकेट मध्ये त्याला एक मानाचं नाव हि दिलं होतं ते म्हणजे "the wall" म्हणजेच "भारताची भिंत", या नावानेही तो ओळखला जातो. खरेही आहे, कारण मीही त्याची खेळी पहिली आहे. एका तपस्वी साधूप्रमाणे सर्व आयुष्य क्रिकेट ला अर्पण करून तो खेळत होता. क्वचितच तो कमी रन करून बाद होत होता, परंतु जर टिकला तर समोर येणारा प्रत्येक चेंडू मग जगातल्या कोणत्याही गोलंदाजाचा असू दे, तो त्या चेंडूला आपला बळी होण्याची संधी देत नव्हता, प्रत्येक गोलंदाजाला तो रडवल्याशिवाय राहत नव्हता. त्याला बाद करण्यासाठी सर्व गोलंदाज रक्ताचं पाणी करत असत परंतु " the wall " ला मोडणे एवढे सोपे नव्हते राव.

माझ्यासाठी द्रविड एक आदर्शच आहे असे म्हणायला हरकत नाही. त्याचा स्वभाव, त्याचा भारतीय संघाबरोबरीचा एवढा प्रवास, शिस्तबद्धता, सहनशीलता, शांतपणा, खेळातील तंत्रज्ञान यामुळे तो एक आदर्शच म्हणायला हवा.

क्रिकेटमधील त्याची कामगिरी पाहता आजपर्यंत केलेली सर्वोत्तम कामगिरी हि एकदिवसीय सामन्यापेक्षा कसोटी मध्ये केलेली आहे. त्याने १६४ कसोटी सामने खेळले असून त्यात १३२८८ रन्स केलेत व सचिन नंतर सध्या जगातील २रा खेळाडू ठरला आहे, तर ३६ शतके ठोकत २०० पेक्षा जास्त झेल घेतल्या आहेत, त्याचा तो क्रिकेट प्रवास आठवला कि एका महापुरुषाची आठवण येते, अंगावर शहरे येऊन खूप अभिमान वाटतो त्याचा. खरच त्याला या क्रिकेट मध्ये व जन्मात विसरणे शक्य नाही. सौरव गांगुली ने कर्णधार पद सोडल्यानंतर राहूलनेच कर्णधारपदाचा भार सांभाळला होता. तसेच तो एक चांगला यष्टीरक्षक हि आहे. कधी कधी गोलंदाजीही केली आहे. त्यामुळे तो एक अष्टपैलू खेळाडू आहे. अशा या खेळाडूला माझ्या कडून पुढील आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना व शुभेच्छा.

- महेंद्र राजेशिर्के

Thursday, March 8, 2012

वाचक हाच श्रोता?

वाचनाचा छंद अनेकांना असतो. तसेच ती एक चांगली सामाजिक कृती अथवा संस्कार आहे. वाचनासाठी  आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे लहानपणीचे शिक्षण, या शिक्षणामुळे आपल्याला लिहिता, वाचता येते. सर्वच जण शिकतात, शाळेत तसे भाग असते, लिहिणे आणि वाचणे, परीक्षा देणे इ. त्यातील काहीच जणांना वाचनाची आवड लागते, लिखाणाची आवड निर्माण होते. तासनतास वाचन करणे हे त्यांना कठीण नसते. तर तो त्यांचा छंद बनून जातो. 

बरं वाचन खूप प्रकारचे असते, त्यायोगे वाचकांचे वर्गीकरण करता येईल. अध्यात्मिक वाचन करणार्यापासून ते रोजच्या घडामोडी तील वाचकांचे यात वर्गीकरण होईल. कुणाला गूढ-रहस्य कथा वाचण्याचा तसेच राजकारणी वाचनाचा शौक, कुणाला विज्ञानाचे वाचन आवडणे तर कुणाला इतिहासाचे. खूप प्रकारचे साहित्य व त्याचे वाचक आहेत. असाच एकदा प्रश्न पडला कि वाचक आणि श्रोता यात फरक काय.

वाचक म्हणजे जो लिखित स्वरूपातील साहित्य वाचतो. तर श्रोता ते साहित्य अभिनयातून बघतो. शेवटी शब्द तेच, सादरी करणात काय तो फरक. माझ्या मते श्रोता जो चित्रपटाच्या व लघुपटाच्या माध्यमातून ते विचार आवडीने एकतो व त्याला त्याचा छंद असतो. श्रोता हाही एका वाचाकासारखा असतो का, घराघरात लागणाऱ्या धारवाहिका लोकं आवडीने दररोज न चुकवता बघतात. किंवा विकत आणून बघतात. जसे एखादे पुस्तक विकत आणावे. पुस्तक वाचावे तसेच एखाद्या लघुपटावर खर्च करावे दोन्हीही सारखेच फक्त उद्देशाच्या दृष्टीने खर्चाच्या नाही. तशी malahi खूप आवड आहे या लघुपटांची, एखाद्या कादंबरीवर एखादी मालिका बनवली तर त्यात फरक काय? मग मी हि मला एक वाचकाच समजेन ना? यावर जरा पुढे वाचूया
काही मुद्दे महत्वाचे वाटतात इथे नमूद करण्यासारखे, खर्चाच्या बाबतीत बघितल्यास पुस्तक वाचताना आपण, पुस्तक आणि तिसरी गोष्ट म्हणजे शांत वातावरण. या खेरीज कशाचीजी गरज लागत नाही. परंतु एखादी मालिका पडद्यावर उतरवायची असेल तर त्याला असलेले खर्च लक्षात घेणे महत्वाचे आहे. मालिकेसाठी अभिनेते, कॅमेरा, योग्य जागा, तसेच त्याचे भाडे इ. गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळेच तर बनलेली मालिका अधिक रंगवून सांगितली जाते, आणि योग्य प्रकारे दाखवली जाते. काय खरच श्रोता जशी मालिका पाहतो तसे पुस्तक वाचेल? तो बघण्याचे माध्यमाच निवडेल. त्यामुळे वाचन आणि माध्यम यात फरक आहेच. कारण प्रत्येक कादंबरीचे मालिकेत रुपांतर करणे जमत नाही, अशा मौल्यवान माध्यमांचे वाचन करण्याच मोह वाचकाला का नाही होणार बरं 

दि. ८ मार्च, २०१२ (धुलीवंदन)
महेंद्र रमेश राजेशिर्के 

Saturday, February 11, 2012

मला हे दत्तगुरू दिसले


३० जाने २०१२

आज दत्तजयंती होती, तशी कामाला सुट्टी नव्हती परंतु खूप वेळ होता संध्याकाळी. हा लेख लिहिण्याचा मानस म्हणजे मी अनुभवलेला काळातील व जागतिक मानसिकतेतील बदल किंवा त्याची एक अनुभूती. दरवर्षीप्रमाणे विभागातील भजनी मंडळ त्यात मी हि एक भाग होतो, दोन ठिकाणी भजनाचा कार्यक्रम करणार होतो. एका ठिकाणी चाळीत तर दुसऱ्या ठिकाणी उच्च्प्रभू इमारतीत. चाळीत भजन एक आदर्श अचारसरणी किंवा एक सामाजित आदर्श व मान होता. तसे चाळीत खूप स्वागत झाले, लोकं आवडीने भजन ऐकत होते. इथे बहुसंख्य अशी अवस्था होती. तसे पाहिल्यास त्या चाळीत हि श्रीमंत लोकं होतीच, त्यांचे संस्कार कि काही माहित नव्हते परंतु ते भजनात आवर्जून बसतात व साथ देतात, त्यांना बहुतेक अभंग हि पाठ असतात हि वस्तुस्थिती. अशा लोकांचा देव पूजेतील सहभाग खूप मोठा असतो. तसेच समाजकारणात हि आधुनिक विचारसरणी असते. फरक एवढाच असतो कि असे लोक चाळीत राहतात कारण ते त्या समाजाला विसरू शकत नाहीत, ते तेथेच वाढलेले असतात व इतर लोकांची त्यांना सवय झालेली असते. चाळीत भजन खूप रंगले, महत्वाचे म्हणजे एक वयस्कर परंतु ज्ञानी प्रवचनकार यांनी भजनात साथ दिली, क्वचितच येतात शहरात मुलाकडे, राहणार पंढरपूर पदवीधर संस्कृत विचायक ज्ञान होते, तसेच ज्ञानेश्वरी वर गाढ अभ्यास होता त्यांचा. नशिबाने ते या भजनात भेटले. आमच्या काही निवडक अभंगानंतर त्यांना आम्ही भजन म्हणण्यास विनंती केली, त्यांच्या मते ते फक्त प्रवचनकार होते त्यामुळे त्यांना भजनी चाल लावणे अशक्य होते, तरीही काही अभंग सादर केले, खूप अनोळखी होते अभंग त्यांचे. तसेच कधी न ऐकलेले असल्यामुळे कोणालाही त्या टाळांच्या आवाजात ते शब्द एकू येत नव्हते, त्यामुळे ते अभंग नाही म्हणू शकलो याची खंत वाटते, त्यातला एक अभंग आमच्यातील एकाला कळला हे नशीब. झालं शेवटी भजन समाधानपूर्वक संपले.

आता आम्ही पुढील भजनाची वाट पकडली, सर्व साहित्य एकमेकांनी खांद्यावर घेतले आणि निघालो, ती वाट थोड्या दुतर्फा झाडांमधून जात होती, त्यात त्या पंढरपूरच्या बाबांनी आमच्या बरोबर भजनाला येण्याचे मान्य केले, त्यांनी आपल्या कथा सुरु केल्या, त्या अंधारामय वाटेत त्यांच्या कथा एकण्यात खूप रस येत होता. त्यांच्या मते त्यांनी संस्कृत शिकले होते म्हणून ज्ञानेश्वरी अभ्यासासाठी त्यांना अडचण आली नाही, त्यामुळे मला संकरित शिकण्याची उत्सुकता वाटली, तशी आहेच उस्तुकता. कारण एखादे ज्ञान आपल्याला मिळाले तर ते इतरांना आपण देऊ शकतो व एखाद्या साहित्याचा प्रसार व अर्थ समजावू शकतो. झालं त्या बाबांनी एक प्रश्न विचारूनच टाकला आम्हाला, आमच्यात ५० % तरुण होते, ते म्हणाले या जगात महत्वाचे ३ ऋषी होऊन गेले, सांगा पाहू कोण होते ते आणि प्रथम त्या ऋषींचे प्रकार काय आहेत,  आमच्या मंडळातील काही सुजाण व्यक्तींनाही तो एक यक्ष प्रश्न पडला याचे नवल वाटले, तरीही एकांनी सांगितले देवर्षी... महर्षी परंतु तिसरा प्रकार काय ते सांगू शकले नाहीत, कारण जर चुकीचे बोलले तर पंचाईत व्हायची, मग त्या बाबांनीच सर्व प्रथम ऋषींचे प्रकार सांगितले, ते म्हणजे अनुक्रमे देवर्षी, महर्षी आणि राजर्षी, चला आता यातले देवर्षी कोण आहेत ते सांगा, एकाने सांगून टाकले, देवर्षी नारद, चला दुसरे? महर्षी व्यास अजून एकाने सांगून टाकले, बाबा उत्तरले वा!!! छान, आणि तिसरे? सर्व जन गप्प कारण तिसरे उत्तर येत नव्हते. मग बाबांनी सांगितले राजर्षी विश्वामित्र, जो राजाचा ऋषी झाला तो ऋषी म्हणजे राजर्षी. असा ऋषी जो ऋषी होण्यापूर्वी सत्ताधीश होता, मांस भक्षण करत होता, वध करणारा होता त्याचा झालेला ऋषी म्हणजे राजर्षी, चला मला काहीतरी नवीन शिकायला मिळाले. त्यानंतर मी ऋषींबद्दल थोडे वाचले तेव्हा कळले कि ब्रह्मर्षी, सप्तर्षी असे खूप प्रकार आहेत ऋषींचे. परंतु त्या बाबांनी जे वेगवेगळे फरक असलेले प्रकार सांगितले ते खूप महत्वाचे होते. तसेच वाल्याचा वाल्मिकी होतो हे लोकांचे संबोधन हि आठवले.
आता आम्ही एका भव्य इमारतीच्या सहवासात आलो, त्या इमारतीत दरवर्षी आमच्या मंडळाचे भजन असते. आम्ही गेलो तेव्हा लहान मुलांचे नाचाचे कार्यक्रम चालू होते. सर्व इमारतीतील व्यक्ती कुटुंबासहित खुर्च्यांवर बसून ते कार्यक्रम पाहत होती. आपली मुले फिल्मी गाण्यांवर कशी नाचतात हे पाहून गहिवरली होती आणि गाणी हि मोठ्या आवाजात, गर्दी खेचून आणत वातावरण नाचवत होती. मी यात अभंगाची तुलना करत होतो. काय खरच या गाण्यांचा आणि अभंगांचा ताळमेळ होईल? छे नाही... मन सारखे म्हणत होते. आम्हाला तो कार्यक्रम संपेपर्यंत वात पहावी लागणार होती, मला यात समस्त वारकरी संप्रदायाचा अपमान वाटत होता.

असो, ती मुले मोठ्या उत्सहाने नाचत होती. इतर लोकांमध्येही उत्साह होता. क्षणार्धात वाटले आणि खराही आहे, किती आनंदी जीवन जगतात माणस या sansarat डुबून जातात, पोहत असतात, त्यांनाच माहित नसत कि ते कुठे पोहत चालत चाललेत. पण जो मार्ग मिळेल तो मार्ग एखाद्या बागेसारखा फुलवून टाकतात, खूप दुखी माणसा बघितली आहेत मी, काही मागच्या गोष्टी विसरणं भागच असता इथे, माझ्या म्हणण्याचा अर्थ म्हणजे जर एखाद्याला संस्कृती टिकवायची असेल आणि वटपौर्णिमेला वडाच झाड नाही मिळाल कि वादाची एक फांदी मिळाली तरी त्यावर समाधान मानावं लागतं ना तसं.

चला झाला तो कार्यक्रम संपला व निवेदकाने त्या चहू बाजूंनी असलेल्या इमारतीच्या पटांगणआतील मंचावर उभे राहून जाहीर केले कि, आता अमुक अमुक भजनी मंडळाचा कार्यक्रम चालू होणार आहे तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, रात्रीचे ११ वाजले होते, तसे आम्ही मंचावर सामानाची लावणी सुरु केली, सर्व जन अगदी उत्साहाने बसले मध्ये पक्वज वादक होता. सर्व जण त्याच्या भोवती कृष्णाच्या सवंगड्यासांरखे बसले होते. थोड्या वेळाने गजर सुरु झाला आणि भजन सुरु झाले, भजनात कधी गुंग झालो कळलेच नाही, काही अभंग झाल्यावर मागे लक्ष गेले, बघतो तर काय, केवढी मोठी संख्या होती ... खुर्च्यांची. थोड्या वेळापूर्वी झालेली गर्दी भजनात केव्हा नाहीशी झाली कळलेच नाही. लोकांचा अध्यात्माकडे बघण्याचा दृष्टीकोन किती वेगळा असतो हे अनुभवले. भजन झाले व काही ४-५ कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर आम्ही परत yayla निघालो, १ वाजला होता त्या दुतर्फा अंधारलेल्या मार्गातून चालताना सर्व जरा शांतच होते, विचार एकाच असावा म्हणून एकाने प्रश्नच केला, प्रश्न कसला वस्तुस्थितीच होती ती. मग त्या बाबांनी यावर चर्चा सुरु केली. त्यांना अजब वाटले, परंतु शहरात असे पाहायला मिळणार हे काही नवल नव्हते. त्यांना लोकांकडून जे अपेक्षित होता ते मिळाल नव्हतं. त्या दत्तजयंतीला दत्त हरवला होता असे वाटू लागले होते. तरी मला त्या बाबांच्या रुपात दत्ताचे दर्शन झाले असेच वाटले आणि शेवटी मी हि म्हणालो "मला हे दत्तगुरू दिसले" त्या बाबांच्या नावाने मी ती दत्तजयंती अशी साजरी केली.

- महेंद्र