रोज मर्राच्या जीवनात कुठेतरी ऐकायला मिळते कि विश्वासघात झाला बेईमानी झाली, शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहास बघितला तर "दगा दिला" हा शब्द अजून कानात गुमगुमत राहतो. माझ्या मते सर्व विश्वात माणूस हा असा प्राणी आहे ज्यावर आपण विश्वास ठेऊ शकत नाही. असे नाही वाटत? तर कारण काय असावे, कोणी म्हणेल कि माणसाला विचार स्वातंत्र्य आहे, स्वतःचे मन आहे, कोणी म्हणेल अहो माणसाला संस्कार योग्य रीतीने मिळाले नाही तर कदाचित मनुष्य असे वागत असेल. कोणी म्हणेल जर समोरील व्यक्तीकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर बदल घेण्याच्या वृत्तीने व्यक्ती विश्वासघात करून त्याला त्रास देत असेल. कारण काहीही असो, हजारो मनांची हजारो विश्लेषण शेवटी काय मनुष्य हा सृष्टीतील सर्वात बुद्धिवान आणि दगाबाज प्राणी आणि तो कधीही कोणाचाही विश्वासघात करू शकतो किंवा देईल याचं नेम नाही.
पण मी जेव्हा इतर प्राण्यांची तुलना मनुष्याशी करतो तेव्हा असे कळते कि इतर प्राणी हे खूप विश्वसनीय असतात. आपला सभोवताली अनेक पाळीव प्राणी आहेत, त्यातील सर्वात इमानदार आणि विश्वसनीय प्राण्यांचा विचार करता "कुत्रा" हा प्राणी समोर उभा राहतो. तीक्ष्ण डोळे, संशयी नजर, कान वर टवकारलेले, तोंडाबाहेर लोंबत असलेली जीभ, असा प्राणी मनुष्याला खूप मदतशीर आहे. इतिहासात डोकावले कि शिवाजी महाराजांच्या "वाघ्या" कुत्र्याची प्रतिमा डोळ्यासमोर येते. हा कुत्रा खूप शूर होता, कुत्रे हे जंगली प्राण्यांची शिकार अत्यंत चोखपणे करीत असत, ते वाघाला हि भारी पडत असत असे इतिहास सांगतो, कोल्हापूरला गेल्यावर शाहू महाराजांच्या राजवाड्यात जरूर जावे, तेथे काही छायाचित्रात त्याकाळातील शिकारी जीवन रेखाटले आहे, त्यात एका छायाचित्रात काही वाघ आणि काही कुत्रे मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजेच त्या वाघांची शिकार त्या कुत्र्यांनी केली, परंतु अशा इमानदार कुत्र्यांचा बळी गेलेल्या कुत्रांचे फोटो बघताना वाईट वाटते, या गोष्टीवरून असे लक्षात येते कि, कुत्रा हा मालकाशी एवढा इमानदार आहे कि आपले प्राण हि देऊ शकतो. पण कुत्रा हे सर्व आपल्या मनाने करतो ka? त्याला काय गरज वाघांशी झुंज घेलायची., याचे एकच कारण त्याची मालकाशी असलेली इमानदारी, प्राणापलीकडे एखाद्यावर श्रद्धा ठेवावी ती कुत्र्यांनी. त्यांना नसते स्वतंत्र विचारसरणी, बुद्धीमत्ता, पण अशी कोणती गोष्ट आहे कि त्यांना एवढी इमानदारी करण्याची गरज भासावी, ती म्हणजे त्यांमध्ये असलेला एक मुलभूत गुण. जो माणसात अमावस्या पौर्णिमेला येतो. आणि कधी जातो याचं मुहूर्त तोच बांधतो.
असा हा कुत्रा हा प्राणी कित विश्वासू आणि इमानदार असावा. या बद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच. आयुष्यभर एका मालकाशी एकनिष्ठ राहून त्याची सोबत न सोडता अगदी मालक मूर्च्छ येऊन पडल्यानंतरही काही काळ तेथेच गहिवरून बघत राहिलेला, आपला मालक का असं करीत आहे. कदाचित हे त्याला कळतंच नसेल. पण मालकाचे प्राण जाऊनही खूप काळ त्याच्या शेजारी बसून मालक शुद्धीवर येण्याची वाट पाहणारा असा हा प्राणी, आणि आता असे वाटते कि तो अद्यापही वाट पाहत आहे कि मनुष्य अजून शुद्धी वर येत नाही, आमची इमानदारी त्यांना कधी लाभेल.
पण खरच मनुष्य हा प्राणी एवढा इमानदार आणि विश्वासू आहे? हा प्रश्न पडणे गैर नाही. एखाद्याला दिलेला शब्द न पाळणे हे तर सामान्य झाले आहे, काही काळ असा होता कि शब्द हा प्राणापलीकडे होता. आता तर शब्दांचे विश्छेदन करून त्याचे १२ वे १३ वे कधी केले जाते सांगता येत नाही. आपला विशासघात कोण करतो असा प्रश्न येतो तेव्हा हेच माणूस बोलतो कि ज्यावर आपण विश्वास ठेवतो तो विश्वासघात करतो. मग विश्वासच ठेऊ नये कोणावर. मग विश्वास ठेवावा कोणावर? खरच अशा लोकांची निर्मिती कर्तुत्रीम्रीत्या केली जाईल संशोधन करून?, का बिघडतो समाज? का पळत नाहीत लोक शब्द, का फसवणूक करतात? आणि अशा फसवणूक करणार्यांचे समर्थनही केले जाते. आपल्या भोवती खूप असे राजकारणी काही ढोंगी समाजसेवक, शिक्षक, डॉक्टर, वकील, पोलीस, न्यायाधीश अहो इतकेच नव्हे तर स्वतःचे आई वडील हि, वडिलांनी आपल्या मुलीवर अत्याचार केल्याच्या तसेच आईने जन्म्जात्या मुलीला यमसदनी पाठविलेल्या बातम्या आहेत. मग तुम्हीच विचार करा खरे विश्वासू कोण हे प्राणी कि मनुष्य?
माझे तर हेच म्हणणे आहे,
घर पाहावे बांधून, लग्न पाहावे करून,
झाले गेले गंगेला मिळाले,
यापुढे कोणी कोणाला म्हटले, "काय रे कुत्र्या" तर मला ज्याला म्हटले आहे त्याला एक पदवी दिल्यासारखे वाटेल :)
No comments:
Post a Comment