Sunday, December 25, 2011

बुद्धीबळ आणि युद्ध

दि. २४ डिसें. २०११

सर्वप्रथम इतिहासातील समर योद्धे, युद्धांगना आणि त्यांच्या कुशल बौद्धिक कामगिरीला मुजरा. बुद्धीबळ हा खेळ खेळताना खूप वेळा प्रश्न पडला खरच बुद्धीबळ या खेळाचा उपयोग वास्तविक युद्धात केला गेला का? खरच का गनिमी कावा करताना शिवाजी महाराजांनी हा खेळ खेळला होता? परंतु त्यांनी गनिमी कावा अत्यंत चतुराईने खेळला आणि त्याचा प्रभाव विरोधकांवर पडला. बुद्धीबळ या खेळाचा इतिहास खूप प्राचीन काळापासून आहे, सुमारे १५०० वर्षापसून या खेळाची चर्चा या जगतात आहे, याची सुरुवात झाली ती भारतात गुप्त साम्राज्यापासून, याच इ.स. ६ व्या शतकामध्ये या खेळला "चतुरंग" म्हणून ओळखले जात होते., नंतर हा खेळ भारतानंतर पर्शिया येथे खेळला जाऊ लागला, पर्शिया वर झालेल्या मुस्लीम सत्तेच्या अर्कामानानंतर मुस्लिमांनी या खेळावर पकड बसवली आणि हा खेळ दक्षिण युरोपात गेला.

चतुरंग म्हणजेच चार भाग (सैन्याचे चार भागात वर्गीकरण) हत्तीदल, पायदळ, रथदल आणि घोडदल. म्हणजेच या खेळातील चाल महत्वाचे भाग अनुक्रमे हत्ती, प्यादे, घोडा आणि वजीर. युद्धात हत्तीचे खूप महत्व होते. त्यामुळे बुद्धीबळातही हत्तीची चाल खूप प्रभावी आहे. हत्ती सरळ उजवीकडे व डावीकडे कितीही घरं जाऊ शकतो. परंतु युद्धात मात्र तो तिरका जाऊ शकतो हा एक फरक आहे. वास्तविक पाहता बुद्धीबळ हा खेळ एखाद्या योध्याच्या मानसिकतेची परीक्षा घेणारा आहे. जर समोरचा स्पर्धक चलाख असेल आणि चाल खेळून तो त्याच्या पुढे नतमस्तक होत नसेल तर योध्याच्या म्हणजेच पहिल्या खेळाडूच्या सहनशीलतेचा अंत होतो., त्यामुळे हा खेळ खेळाडू किती सहनशील आहे याची परीक्षा घेणारा असावा. युद्धामध्ये असे अनेक युद्धे झाली ती काही वर्षे चालली. त्यामुळे कोणता योद्ध हा दीर्घ काळ पर्यंत युध्द करू शकेल हे समजते. प्रत्यक्ष युद्धात महत्वाच्या गोष्टी म्हणजे योध्यांची संख्या त्यायोगे दिवसातून किती वेळ युध्द करावे तसेच हवामान, साथीचे रोग प्रतिस्पर्ध्याची ताकद या व अनेक गोष्टींचा विचार केला जातो. या गोष्टी ह्या सुदृढ मानाने घेतल्या जात असल्यामुळे बुद्धिबळ हा खेळ एक परीक्षा ठरू शकतो.

विजयनगरच्या सम्राटाच्या कारकिर्दीत बुद्धिबळ हा खेळ खूप खेळला जात होता.

राजाची जागा मला खूप कुतूहलाची वाटते कारण राजा हा बुद्धिबळात खूप महत्वाचा म्हणजे जर राजा असेल तर खेळ संपला असे आहे. मानून राजाला संरक्षित करण्यासाठी वजीर, हत्ती, घोडे, उंट व प्यादे यांची झुंबड उडते. का राजा हा महत्वाचा आहे खेळत आणि युद्धातही? हो खर आहे राजा हा जनतेचा आधार स्तंभ असतो. यथा राजा तेथ प्रजा असे म्हटले आहे. एखादे युद्ध डोळ्यासमोर आणा, युद्ध हत्ती घोडे, उंट, तलवारी, तोफा, रक्त, जखमी सैनिक, आणि हिर्यासारखा तेजपुंज असा राजा उभा असतो मैदानात, सर्वांची नजर सेनापती वर असते. काय असेल पुढचा आदेश. त्या आदेशानुसारच ते लढणार, कोणाला नाही कोणाचे विचार. ते फक्त आपल्याला मिळालेल्या शिकवणुकीच्या व युद्ध्कौशल्याच्या जोरावर लढणार. तेवढ्यात एक तलवार येते आणि राजाच्या मानेवरून फिरते. साप साप..... राजाचे धड आणि मुंडके क्षणार्धात वेगळे होतात. आणि बस... शांतता पसरते सर्वीकडे. सैनिकांचे मनोबल क्षणार्धात विरघळून जाते,. कोसळते.... आपला राजा गेला, सर्वस्व गेलं.... आणि मग राजाच्या जागी उभा होतो तो प्रतिस्पर्धी सैन्याचा सेनापती व तो आपला झेंडा तेथे गाढ्तो. असे काही झाले विजयनगरच्या युद्धात. आणि विजयनगरचा ह्रास झाला.

खरं तर या गोष्टीवर चर्चा होणे स्वाभाविक आहे त्या अनुषंगाने मी काही लेख शोधात असताना एक लेख मिळालाच तो म्हणजे "chess and war " त्यानुसार काही प्रश्न विचारले गेले लोकांकडून ते म्हणजे "काय बुद्धिबळ हा खेळ आहे, कि विज्ञान, कि कला" याचे उत्तर कदाचित आपल्याला पुढील लेखात कळेल. स्वीडेन च्या jesper hall यांच्या या लेखात त्यांनी एका संभाषणासह काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ते एकदा रेल्वेच्या dinner रूम मध्ये फेर्या मारत असताना एका राखाडी रंगाच्या केसाळ माणसाने एक प्रश्न विचारला "बुद्धिबळ काय आहे?"  त्यांनी त्याला उत्तर दिले पण नंतर काळे कि तो प्रश्न विचारणारा माणूस एक निवृत्त सैनिकी अधिकारी होता. त्या दोघांनी तो पूर्ण प्रवास या चर्चेत घालवला त्यामध्ये त्यांनी आपण कसे बुद्धिबळाच्या सहाय्याचे इतिहासातील मोठी युद्धे सर केली. आणि त्या युध्दाची निति बुद्धिबळावर साकार केली. hall यांनी Cannae चे युध्द उलगडले, त्या युद्दात जनरल हानिबल च्या अधिकारकषेतील कारथाजिनिअस ने रोमन्स ना आपल्या अतुलनीय युद्ध्नितीने कसे चिरडले आणि १९६७ साली झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेशी व त्या विजेत्या स्वीडिश चम्पिअन रोल्फ मार्टेन्स याच्याशी हे कसे संबंधित आहे हे नमुद केले.

मार्टेन्स ने एका नव्या बुद्धिबळाच्या चालीचा शोध लावला त्याचे नाव होते. "Ultra-Hyper Modern Counter Attack" school for black ".हि चाल (छायाचित्रात दिल्या प्रमाणे) दुसर्या महायुद्धातील रशिया आणि जर्मनी ची युद्धनीती दर्शविते. हाहाहा म्हणजे दुसर्या महायुद्धात देखील बुद्धिबळाचा वापर करून विजय मिळवला होता हे सिध्द होते. त्यामुळे जे लोक बुद्धिबळ हा फक्त खेळ आहे असे समजत असतील तर त्यांना माझा इशारा आहे कि हा फक्त एक खेळ नसून एक युद्ध आहे.

अशीच एक कविता बुद्धिबळाच्या पटावरची एका अनामिक कवीकडून सादर

जगाच्या या पटावरती एक प्याद चालत होत,
नजरा चुकवत सर्वांच्या लक्ष्य आपल गाठत होत....
शेवटच्या घरात आल तेव्हा प्याद आता वजीर झाल होत ;,
बेफान ताकत घेऊन राजालाही नाचवत होत,
मात झाली , खेळ संपला पण प्याद आपल्याच नशेत होत ,
नवा डाव मांडला तेव्हा प्याद पुन्हा प्यादच होत. !!!


- महेंद्र

No comments:

Post a Comment