काल सह्याद्री वाहिनी वर "अखेरची रात्र" हि कथा कार्यक्रमातून काही नामवंत कलाकारांनी साकारली होती. यात श्री कृष्णाची व्यक्तीरेखा श्री. माधव आपटे यासारख्या नामवंत कलाकाराने साकारली होती. या कार्यक्रमातील वातावरण एवढे गंभीर होते कि, ती महाभारताची आदली रात्र प्रेक्षकांसमोर जिवंत केली होती. ती रात्र तो अंधार इ. कृष्णाचे व कुंतीचे विचार त्यांचे संभाषण, धर्म अधर्म याबाबत खूप युक्तिवाद दाखवला आहे. धर्म काय आहे, अधर्म काय आहे हे समजायला खूप कठीण, कृष्णाच्या कला या कुन्तिलाही समजल्या नाहीत. त्या रात्री कृष्णाने स्वतः कुंतीला कारणाकडे पाठवले, का तर द्रौपदीला त्याची धर्मपत्नी बनवण्याचे आमिष दाखवण्यासाठी, त्यायोगे तरी तो युध्द विराम जाहीर करेल, कुंतीच्या मनाची अवस्था छिन्न विच्छिन्न झाली होती, तिने कृष्णाला दोष दिला आणि म्हणाली, तू त्यावेळी जो खेळ झाला तो पुरे नाही? कारणाने भर दरबारात द्रौपदीला वेश्या म्हटले ते विसरलास? परंतु कृष्णाच्या मनात वेगळेच होते, कारण त्याला भविष्य माहित होते. त्याने कुंतीला समजावले, शेवटी सत्य हे सत्यच असते, कर्ण उदार मनाचा आहे, उदार माणसाच्या एका कोपर्यात उदारता असतेच आणि ती जागृत व्हायला वेळ लागत नाही. कर्ण समजेल आणि तसा वागेल, काय कर्ण तुझा नाही? का तुला त्याला भेटण्याची आतुरता नाही? ,, कुंती भावनाविवश होऊन कर्णाकडे गेली. कर्णाने तिचे स्वागत केले. व एवढ्या वर्षानंतर येण्याचे कारण विचारले. तीलाही कर्णाला भेटण्याची आतुरता झाली होती. काही संवादानंतर ती त्याला म्हणाली अर्जुन आणि तू मला सारखेच आहात, तसेच तू अर्जुनापेक्षा जास्त जवळचा वाटतोस, परंतु मी धर्माच्या बाजूने आहे, आणि तुझा पराभव अटळ आहे, आणि हेच सत्य आहे, नंतर कर्णाच्या लक्षात आले कि, आपण कसे द्रौपादिबरोबर आपल्याच भावजयी बरोबर वाईट वागलो, याची त्याला लाज वाटली,
तात्पर्य कृष्णाची खेळी खरी ठरली, त्याने कर्णाच्या आतील पुत्र तथा भाऊ जागा केला होता, आणि त्या रात्री त्याला अजून भावविवश करून युद्धात हरण्याचा अजून एक मार्ग खुला केला होता, कर्ण हि कुंतीला म्हणाला, मी अर्जुनाला घाबरत नाही, परंतु त्याबरोबर जो कृष्ण आहे त्याला घाबरतो तसेच त्याबद्दल इर्षा आहे, कारण अर्जुनाची शक्ती दृश आणि कृष्णाची शक्ती हि अदृश आहे, तो भूतकाळाला कधीच क्षमा करत नाही, वर्तमान आपल्या हातात ठेवतो, आणि भविष्य तसेच घडते.
No comments:
Post a Comment