एस.टी. stand वरून गाडी सुटली. सोडायला आलेल्या सर्वांनी हात दाखवला. "घरी पोहोचल्यावर फोन कर" असं सारखं बजावून संगत होती सर्व. सर्वांनाच एक स्मित छान स्मित देत होती ती आणि निमुटपणे हो हो करीत होती. एकदाची गाडी सुटली आणि मार्गली लागली. तसा ३ तासांचा प्रवास होता. पण ते ३ तास तिला ३ महिन्यांसारखे वाटत होते. घाईच तेवढी झालेली तिला. कारणच तसं होत. लग्न होऊन १० वर्षे झाली होती तरीही ती माहेरची पायरी चढली नव्हती या दरम्यान ती. कितीही म्हटल कि मुलगी हि परक्याच धन तरी आपली पूर्वीची आणि न तुटणारी नाती कशी विसरू शकेल ती. नाही जाऊ म्हटल सासरच्यांनी माहेरी मग त्यांना इतरांना न दुखवणारी ती तरी कशी तोडेल मन एखाद्याचे. पण यावेळी भावनाविवशतेच्या उंबरठ्यावर उभी होती. कुठेतरी या सर्वाना जुमानुन आपल्या मनाचं ऐकायचं तिने ठरवलं होत. एस. टी. मधेच ती झालेलं प्रकरण आठवू लागली. माहेरी जाण्याचा विचार करणे खूप कठीण होते. पण झाला वाद सासरी. तिने एकदा मागणी टाकली सासूबाईंपुढे
"जायचं म्हणतेय माहेरी या दिवाळीत"
पतीच्या हि कानावर घातलं तिने. सासू बाईंनी घर जणू डोक्यावर घेतल
"तू जाणार माहेरी आणि घरची कामं कोण करणार, तुझी आई येणारं आहे का? इथे मला एकटीला दिवाळीची कामं करायला लावतेस व्हय!, तू तिथे जाऊन आराम कर आणि मी इथे कसबसं कामं करू तेही दिवाळीच्या ऐन वेळी? तुझ डोक ठिकाणावर आहे का, घरात आपण दोघीच त्यात दिवाळीचा हा पसारा, आपल घर म्हणजे पंचक्रोशीत नावाजलेलं घरात बाईमाणूस नाही मग लोक नाव ठेवायला कमी करणार आहेत का?" झालं सासू बाईंना हे मोठ कान मिळाल आणि त्यांनी तिच्यापुढे हे ठेवल. आता तिची अवस्था बघावीशी वाटत नव्हती. नात्यांमध्ये गुंतून पडली होती बिचारी.
शेजारच्या माधुरी बरोबर तिचं पटत होत. माधुरी हि तिच्या शेजारच्या घरातील एकुलती एक सून होती. १ वर्षापूर्वी तीच लग्न झालं होत. महत्वाचं म्हणजे प्रेमविवाह होता. माधुरी च्या माहेरी त्या विवाहाला विरोध होता पण तिने कोणाचेही एकले नाही. तसेच तिच्या सासरच्यांनी हि विरोध केला. पण नवरा हि होता हट्टी, लग्न करायचा त्यांनी निर्धारच केला होता आणि शेवटी दोन्ही घरांच्या संगनमतान झालं एकदाच लग्न पण एका अटीवर. माधुरीच्या वडिलांनी तिला बजावून सांगितले "लग्न करतेस खरं आमच्या विरुद्ध पण यापुढे परत या घरात पाउल ठेऊ नकोस" माधुरीच्या मनाला अस्वस्थ करणारी ती अट होती. शेवटी माधुरीने आपला पती हाच परमेश्वर मानून सर्वांचा निरोप घेतला होता. माधुरीचं आणि या कथेच्या नायिकेचं खूप पटत होतं. दोघीही एकमेकिंशिवाय कुठेही जात नव्हत्या, दोघींच्याही घरी खूप दरारा होता त्यामुळे त्यांना काहीतरी कारण सांगूनच घराबाहेर पाडाव लागत होतं.
अशी हि माधुरी, तिने हि गोष्ट माधुरीला सांगितली., सांगताना माधुरीला खूप गहिवरून आले कारण तिला तिचं माहेर आठवलं होतं तिच्या बोलण्यात, पण क्षणार्धात माधुरीने तिचे लक्ष नायिकेकडे वळवले व तिचे एकू लागली. माधुरीलाही तिच्या सासूचा स्वभाव आवडत नव्हता., माधुरी लगेच म्हणाली "काय गं, हि तुझी सासू सुधारणार तरी कधी" मग नायिकेने माधुरीला सांगितले "आता काही नाही मी माहेरी जाणार म्हणजे जाणारच" तिचा निर्णय ठाम होता धनुष्यातून बाण सुटावा तसा. तिच्या मनात एक झ्वालामुखीच जन्माला येऊन वाढत होता. पतीजवळ ती जरा मोकळेपणाने बोलत असे इतरांच्या तुलनेने. घरात वाद नको म्हणून ती शांतच राहायची. तिचा हा गुण शेजारचेही लोक बोलून कौतुक करायची. एकदा तर शेजारच्या आजींनी टोमणा मारूनच टाकला "ह्या घरात सुनेने मागील जन्मी खूप पाप केलं असेल म्हणून तिला असं सासर मिळाल आणि मागील जन्मी सासूने खूप पुण्या केल बाई कि तिला अशी चांगली सून मिळाली" शेवटच सुनेबद्दल बोलताना एक स्मित हास्य देत कडकडून बोटं मोडली होती.
थोडे दिवस गेले, झालं नायिकेने एकदा वेळ बघून आपले बोलणे सर्वांसमोर मांडायचे ठरवले. दुपारची वेळ होती. सर्वजण जेवायच्या तयारीत होते. सासरे हात पाय धुऊन खुंटीला टॉवेल टांगणार तेवढ्यात नायिकेने सासू बाईंबरोबर वाद करायला सुरुवात केली, सर्वांना ऐकायला जाईल या स्वरात ती म्हणत होती. एवढ्या मोठ्या आवाजात ती प्रथमच आपले म्हणणे मांडत होती. ती म्हणाली
"या घरात १० वर्षे झाली संसार करून आई, पण अजून एकदाही मला माहेरी जाऊ दिलं नाही तुम्ही. काय मला बाकीची नाती नाहीत? तुमची मुलगी येते न दर वर्षी मग तेव्हा आठवत नाही कि माझ्याही आईवडिलांना वाटत असेल मला भेटावसं. खूप सहन केल मी या घरात, हे घर आहे कि........"
बस्स... पुढचा शब्द बोल्याआधी तिला आपण खूप बोललो याची जाणीव झाली. तिचे हात थर थर कापत होते. भूक विसरली होती ती. जीव घाबराघुबरा झाला होता, खूप हिम्मत केली होती तिने, एवढे दिवस दाबलेला आवाज बाहेर निघाला होता, आणि खूप हलकेही वाटत होते. क्षणार्धात तिला प्रश्न पडू लागले कि काय आपण मोठी चूक केली का? पण झाले त्यावर तिचे समाधान होते. सासू बाई तर अवाक्क होऊन बघतच राहिल्या तिच्याकडे त्यांचा थोडा अपमान झालाच होता. सासरे तर खुंटीवर टॉवेल लावत होते परत काढत होते. कारण त्यांचा लक्ष होतं तो स्वयंपाकघरात ., ते ऐकून त्यांनाही तिची कीव आली होती, तिच्याबद्दल आपुलकी वाढली होती. मग पतीने तिला खडसावले जरा पण ती शांतच होती आता. आपले म्हणणे सर्वांसमोर तिने आणले होते. तिला आता गरज नव्हती काही बोलायची.. तरीही तिचं डोक तापलेलं होत. त्यातच तिने पतीलाही सांगून टाकले" ते काही नाही मी जाणार म्हणजे जाणारच माहेरी या दिवाळीत"
झालं त्यावेळी जेवतानाही कोणी काही बोललं नाही. तो दिवस हि शांत गेला, सर्वजण आपापली कामे करीत होते. दुसऱ्या दिवशी माधुरी बरोबर ती अंगणात बसून काही मासिके चाळत होती. नेहमीप्रमाणे त्या दोघींचे विनोद चालू होते. त्या छायाचित्रात एक नाती जीन्स घालून ऐटीत उभी होती. तिच्या कडे बघून लगेच माधुरी म्हणाली " ए तुझ्या सासू बाईंना हि या दिवाळीत अशी जीन्स गिफ्ट दे मग खूष होऊन गावभर मिरवत फिरतील तुझा नावाने हा हा हा हा" आणि दोघींनीही हसायला सुरुवात केली. तेवढ्यात सासरे येताना त्या दोघींनी बघितले. दोखींचा चेहरा अगदी गंभीर झाला होता. ते त्यांच्या जवळ येऊन उभे राहिले आणि हसत म्हणाले "काय कोणता असा विनोद वाचलात आम्हालाही सांगा" ती म्हणाली "नाही बाबा असंच आमचं" मग सासर्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि विचारलं, "काय मग कधी निघणार माहेरी, हिच्याकडून कळलं कि माहेरी जायचा मनात आहे तुमच्या" ती म्हणाली हो जायचं तर ,मनात आलं होतं. पण आपल्या सर्वांच्या परवानगीशिवाय कसं जाणे होईल (तिचा आता माहेरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता, तरीही तिने स्मितहास्य देत आदरार्थी भावाने हे म्हटलं). "जाऊ शकता पण परत लवकर यायचं बघा" असे म्हणत सासरे आत निघून गेले. शेवटचे वाक्य ते जरा गांभीर्याने म्हणून गेले.
आज ती खूप खूष होती, त्याच क्षणी तिने माधुरीला हातात हात घालून गोल फिरवायला सुरुवात केली., तिचं आनंद गगनात मावेना. माधुरीही तिच्या आनंदात सहभागी झाली होती. माधुरी म्हणाली मग "हम्मम्मम्म आता काय, "अजि सोनियाचा दिनू , वर्षे अमृताचा घनु," असे गाणे गाऊन "शेवटी जिंकलीस हा बाजी"असे म्हणत तिने तिचे स्वागत केले,. आणि "चाल माझी कामे आहेत खूप म्हणून हसत हसत ती तिच्या घरी गेली. माधुरी अशी अचानक का गेली हे नायिकेला कळलेच नाही. माधुरीचा राग आला होता तिला, खूप बोलायचे होते माधुरीशी. शेवटी तीही घरी गेली, आज ती खूप आनंदात होती.
कथेच्या नायिकेला दोन मुले होती, मुलगा ६ वर्षाचा आणि मुलगी ३ वर्षाची होती. मुलगी खूप हुशार होती मुलापेक्षा, अगदी आईसारखीच कोणतेही कामं असुदेत आई बरोबर कामं करायला लागणार आणि तेही सर्वात पुढे, भांडी घासणे , कपडे धुणे जेवण करणे नाही जमत तरी "मी करते न" असे म्हणत केविलवाणा प्रयत्न करणार. गुटगुटीत अशी छोटासा फ्रोक घातलेला आणि घरभर बडबडत हिंडणारी अशी होती. मुलगा तर खूप शांत विचारले तेवढेच बोलणारा, पण अभ्यासात हुशार होता, वर्गात नेहमी पहिला यायचा, तसा अभ्यासही घ्यायची ती. दोन्ही मुलेही "आई कुठे जाणार आपण? खूप घुम्म्म जाणार आहे का" असं सारखी विचारत होती. मग तीही त्यांच्याच स्वरात सांगायची "हो आपल्याला कि नाई खूप घुम्म जायचं आहे आजी आजोबांकडे, मग आता गप्प बसून खेळ बाहेर जाऊन" असं म्हणत तिने त्या दोघांना बाहेर आणलं. आणि काही फळीवरची खेळणी काढून दिली.
माहेरी जाताना दोन्ही मुलांना ती घेऊन जाणार होती, मुलांना सुट्टीही होती शाळेत,. पण पतीला येणे जमणार नव्हते काही महत्वाचे कामं होते त्यामुळे बाहेरगावी जाणे भाग होते तिच्या पतीला. झालं मग तिघे जाणार होते माहेरी तिच्या. ती आणि तिची दोन मुलं. तिने माहेरी जाण्याची तयारी सुरु केली. तिची धावपळ सुरु झाली होती, मुलाला शाळेत सुट्टी होती तसेच दोन्ही नातवांना घेऊन ये अशी इच्छा माहेरी व्यक्त केली होती. सासू बाईनिहि तयारीत मदत केली. काही फराळ दोघींनीही बनवला होता तो बांधून दिला होता. नायिका तर आपल्याच नादात कामे करीत होती.
कंडक्टर ने बेल वाजवली एका stand वर आणि एस.टी. मध्ये विचार करीत असलेल्या नायिकेला आपण एस.टी. मध्ये आहोत याची जाणीव झाली. हा सर्व प्रसंग टी आठवत होती. बाजूला बसलेली मुले खिडकीतून बाहेर पाहत एकमेकांबरोबर वाद घालत होती.तिने पर्समधून पैसे काढले तिकीट काढण्यासाठी आणि तिकिटे काढली. २ तासाचा प्रवास अजून उरला होता. कसाबसा १ तास गेला. लग्न झाल्यावर परीतीची वाट ती पहिल्यांदाच पाहत होती. माहेरच्यांना भेटण्यास खूप आतुर झाली होती. खिडकीतून बाहेर नजर गेली तिची. हे आकाश, पक्षी, झाडे, नद्या सर्व तिचे जणू स्वागतच करीत होते असा तिचा भास होत होता. ती आपल्या मधेच खूप खूष होती.
गाडी आली एकदाची गावातील बाजारात, तसा तिला लहानपणीचा काळ आठवला, गावातील सर्व याच बाजारात यायचे बाजाराला. गावाच्या बाजारपेठेत गाडी आली आणि रिकामी असलेली गाडी कधी भरली याचा पत्ताच तिला लागला नाही. कारण गावात जाणारी वेळेची ती गाडी होती. सकाळचे सुमारे १० वाजले होते. सर्वजण बाजार करून परतत होते घरी., नायिकेला या माणसात कोणीतरी ओळखीचे दिसेल याचा पूर्ण विश्वास होता. तसे तिला १ नाही २ नाही तर चक्क तिचे सापडले. तिची बालपणीची मैत्रीण शीला, शेजारच्या पण बाजूच्या वाडीतील क्षारदा काकू आणि बालपणीचा एक मित्र बबन. हे सर्व भेटल्यावर तिला खूप गहिवरून आले. खूप वर्षानंतर या सर्वांना बघितले होते तिने. कडकडून भेटली होती ती त्यांना. ते तिघे तिला बघून आश्चर्य व्यक्त व्यक्त करू लागले. बबन हा खूप साधा होता. त्याला मुलांबरोबर खेळायला खूप आवडत होते. तसा तो मुलांबरोबर मस्करी करू लागला. ती मुलेही आता कोणीतरी नवा खिलाडी भेटला या आनंदात त्याच्याबरोबर खेळू लागली बबन ला लहानपणी खूप ताप आला होता. त्यामुळे त्याची बौद्धिक क्षमता कमी होती. नायिकेच्या लग्नात त्याने खूप काम केले होते. अगदी घरातल्यासारखे, कोणाचीही कामे तो निस्वार्थी पणे करत होता, गावातील सार्वजनिक कार्यक्रमात त्याचा खूप मोठा सहभाग होता. तिच्या लग्नाच्या वेळी तो तिचे समान घेऊन एस.टी. stand पर्यंत आला होता. तिला त्या दिवशीचा तो आताही आठवत होता. लांब टी.शर्ट, गुडघ्यापर्यंत pant असा त्याह पेहराव नेहमीचा.मग तिला तिच्या लग्नाचा क्शन आठवला. लग्नाच्या मांडवात आई वडिलांना निरोप देण्याचा तो प्रसंग होता.त्या काळीच्या कोणत्याही स्त्रीला समजलं असेल काय गत झाली असेल तिची. लहानपणापासून ज्यांच्यासोबत राहिली, मोठी झाली, त्यांना सोडायची वेळ आली होती तेव्हा. तिला कदाचित जाणीव नसावी कि ती ज्या घरात जाणार आहे ते कदाचित तिला माहेरी जाण्याची परवानगी देतील. म्हणून ती खूप रडत होती. ते घर ती माणसे ती विसरू शकत नव्हती. ते नाजूक क्षण ती विसरू शकणार नव्हती, सर्व जण एस. टी. stand वर जमा झाली होती. बस सुटायची वेळ झाली, ती बसमध्ये बसली, मागच्या खिडकीतून तिने सर्वांना हात दाखवला, त्यात तिच्या मैत्रिणी ज्यांबरोबर ती भांडली होती, शेजारी, आई वडील होते. सर्वांनी हात दाखवला आणि एका वळणावर ते दिसेनासे झाले, आता परत ती याच वळणावर येणारं होती., सर्वांना कडकडून भेटायला.
मग शीला आणि क्षारदा काकू यांचे नायिकेशी बोलणे चालूच होते. आता पर्यंत काय काय झालं, मग कुणाला किती मुलं, कोण कुठे आहे सध्या या सर्व गोष्टी झाल्यावर नायिकेने आपल्या माहेरच्या घराबद्दल विचारणा केली. "काय हो क्षारदा काकू आमच्या घरातले सर्व कसे आहेत", क्षारदा काकू जरा टाळूनच बोलल्या."हो बरे आहेत कि" (क्षारदा काकूंचा आणि नायिकेच्या भावाच्या पत्नीशी वाद झाला होता, त्यामुळे त्या एकमेकींच्या घरी फारशा जात नसत). नायिकेला क्षारदा काकूंच्या उत्तराची जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नव्हती. काहीतरी चुकल्यासारखं वाटलं तिला, तिच्या लग्नानंतर तिच्या भावाचं लग्न झालं होतं, त्यामुळे तिने काकूंना प्रश्न विचारला "आलेली सून हि कशी आहे हो?" क्षारदा काकू उत्तरल्या "आता काय बोलणार, खोटं कशाला सांगायचं, तुझ्या लग्नानंतर घर अगदी बदललं हो" तुझी भावजय म्हणजे कैकया, काय घर होतं पूर्वी, आता एक माणूस सुद्धा जात नाही तिथे. अगं कोणी घरात गेल्यावर त्याची उठबस, विचारपूस तरी केली पाहिजे कि नाही. हि बया गावभर हिंडत असते. आणि आली तरी कोणाकडे लक्ष नाही. आणि तुझ्या आई बाबांचा सर्वांसमोर झालेला अपमान मला तरी सहन होत नाही गं, मग कशाला मी जातेय तिथे, उगाच वाद कशाला, आता तूच जाऊन बघ तुझ्या डोळ्यांनी, तुझा भाऊ हि आजकाल शांतच असतो. तरी एक मुलगी झाली आहे तुला तर माहीतच असेल. आता अजून काय नवीन सागायचा राहिलंय, आणि तू पण बदललीस हो, आज एवढ्या वर्षानंतर आठवण आली का तुला आमची" असं म्हणत काकूंनी आपले म्हणणे पूर्ण केले. तोच नायिका उत्तरली "असं नाही आहे, मी तर नेहमी उतावीळ असते पण माझे सासर मला परवानगी नाही देत होते. यावेळी कशीतरी मी आले आहे दिवाळी निमित्त. ते ऐकून क्षारदा काकूनाही तिचं म्हणणं पटलं. काकुनी काचकूच करत तिला प्रश्न विचारला "काय गं तुला सासरी जाच तर होत नाहीये ना." ती म्हणाली "नाही नाही असं काही नाही.खूप चांगले आहेत सर्व म्हणून तर त्यांनी मला परवानगी दिली. खरं म्हणजे सासरी कोणीही नाही, मी आणि माझ्या सासू बाईशिवाय त्यामुळे जाता येत नाही कुठे." असं म्हणत तिने सासरची बाजू सावरली.
थोडावेळ शांतता झाली, घरातील सर्व कळल्यावर तिच्या मनात वादळ निर्माण झालं, तिला आता घरी जाण्याचं वेडंच लागलं होतं. अचानक गाडी थांबली तिची उतरण्याची वेळ झाली होती.सर्व लगबगीने उतरले. बसमधून बाहेर पडताच तिचा पाय मुरगळला, झालं चप्पल तुटली होती. तिने आपल्या चपला काढल्या जमिनीचा तो स्पर्श तिला आपलासा वाटू लागला, वातावरण एकदम आपले आपले वाटू लागले. तिने मुलांना घेतले व घरी आली. एवढ्या वर्षानंतर घराचे वातावरण खूप बदलले होते. ती घरापर्यंत आली होती,. घराबाहेरील जागेत नजर जाताच ती स्वतःशीच म्हणाली. इथे तर खूप झाडे होती., मी लावलेली खूप फुलझाडे गेली कुठे? , काय माझ्या लग्नानंतर रागावून निघून तर नाही गेली ना? असा बालिश प्रश्न तिला पडला. तिची आई बाहेर अंगणात काहीतरी वळत घालत होती. खूप वय झालं होतं आईचं. आईला बघताच तिने हाक मारली. आईलाही खूप आनंद झाला. दुरूनच तिने तिला भेटण्यासाठी आतुरता व्यक्त केली. दोघींनीही एकमेकींना मिठी मारली. अश्रू आवरणे आता शक्य नव्हते. आईने तिला विचारले "काय गं, आज तुला आठवण आली" मग थोड बोलल्यावर आईचं लक्ष मुलांकडे गेलं, तसं तिने त्यांना लाड करून घरात नेलं. सर्व आत गेले तेव्हा तिला तिच्या भावजयीचे म्हणजेच भावाच्या पत्नीचे दर्शन झाले. खरं म्हणजे तिला पहिल्याच क्षणी तिच्या बरोबर पटेल कि नाही याची शंका वाटायला लागली. तिचा भावजयीचा स्वभावाच तसा होता. तिने तिचे स्वागत न करता सरळ आत निघून गेली होती. एखाद्याशी मिळून समजून घेणे तिच्या भावजयीच्या स्वभावात नव्हतेच, पण त्या वेगळ्या स्वभावाच्या घरातील इतर लोकांना तिचा कुठेतरी त्रास होत होता हे नायिकेला समजले. तसा तो दिवस एकमेकांच्या भेटीत व बोलण्यात गेला रात्री भाऊ घरी आला तशी ती त्याला बिलगली आणि खूप बोलू लागली त्यालाही खूप आनंद झालं होता.
काही दिवस गेले. एके दिवशी जे व्हायला नको होते ते झाले. काय होणार? अहो वाद. तिच्या भावजयीला वाद केल्याशिवाय जेवण जात होते का. मग नायिकेने हि माघार नाही घेतली, तिच्या समोर तिने तिच्या आई वडिलांचा अपमान केला होता, एका शुल्लक कारणावरून. थोड्या वेळाने सर्व शांत झाले, नायिकेला अशा वादाची सवय नव्हती आणि तिच्या आई वडिलांनाही. तिला विचार पडला कि कसे हे लोक दिवस काढत असतील. आणि त्यालाही काही उपाय तिला दिसत नव्हता., संध्याकाळी ती डोक शांत करायला बाहेर पडली, तिची नेहमची जागा गावाबाहेरील नदी.
ती आपल्या मुलांना घेऊन नदीवर आली, मुलांनाही खूप आनंद झाला. ती तिला सोडून खेळायला लागली. नदीच्या काही पत्रात पाणी कमी होते. नदी हि तिची आवडती जागा होती., लहानपणी ती खूप वेळ या नदीवर येऊन बसत असे. नदीच्या पाण्यातील शिंपले तिला खूप मोहक वाटायचे. तसे आजही ती नदीच्या पाण्यात उतरली आणि शिंपले जमवू लागली. ती अगदी तिच्या लहानपणी गेली होती. मग थोड्या वेळाने ती भानावर आली आणि मुलांसोबत हिरव्या गार गवतावर येऊन बसली. तरी मूळे मस्ती करीतच होती. मनात विचार चक्र सुरु झाले. आपली रक्ताची नाती सोडली तर तिला आता माहेर पेक्षा तिचे सासरच खूप सुसह्य व आनंदी वाटत होते. थोडे कठोर होते पण आपलेपणा वाटत होता तिला तिच्या सासरी. ती सासर आणि माहेर याची तुलना करू लागली. तिला आपल्या आई वडिलांना घेऊन सासरी घेऊन जावे असे वाटायला लागले. पण ते शक्य नव्हते. आई वडिलांचा हा जाच तिला अस्वस्थ करीत होता. एवढ्या दिवसापर्यंत ती आपल्या सासरच्यांना बोल लावीत होती. पण आता तिला तिचे सासर खूप आपुलकीचे वाटू लागले. तिला तिचेच काळात नव्हते. सासरची खूप आठवण येत होती. माहेरच्या घराबद्दल असेलेली एवढ्या दिवसाची ती आर्तता, आपुलकी कमी झाली होती. चांगल कोण आणि वाईट कोण हे तिला कळणे मुश्कील जाहले होते, तिची द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. आहे त्यात समाधान मानण्याचा निर्णय तिने घेतला होता आता.
दिवस हळूहळू मावळत होता. वेळ हळू हळू सरत होती. सावल्याही आपल्या जागा बदलत होत्या.हळू हळू अंधार होत होता. तिला सर्व आठवत होते.तिचे सासू-सासरे, पती, माधुरी, आई-वडील, भाऊ, त्याची पत्नी. ती एका उंबरठ्यावर उभी होती. दोन घरातील तो उंबरठा होता. ते सर्व तिचे होते. तिला हाताखाली दोन पंख निर्माण झाल्यासारखे वाटले. आपल्या दोन्ही पंखांखाली सर्वांना आधार द्यावा असे तिला वाटू लागले. सूर्य मावळत होता, ती फक्त तेथेच त्या सूर्याकडे त्याला निरोप देत एकटक पाहत बसली होती.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
No comments:
Post a Comment